महापालिकेतील पक्षीय व प्रशासकीय कार्यालयांची साफसफाई मोहीम सुरू
महापालिकेतील पक्षीय व प्रशासकीय कार्यालयांची साफसफाई मोहीम सुरूछायाचित्र : दीपक कुरकुंडे

Thane : महापालिकेतील पक्षीय व प्रशासकीय कार्यालयांची साफसफाई मोहीम सुरू; बंद असलेली महत्त्वाची दालने पुन्हा कार्यान्वित होणार

तब्बल तीन वर्षांनंतर ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून, त्यानंतर आता महापालिकेतील विविध कार्यालयांची साफसफाई व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू झाली आहेत.
Published on

ठाणे : तब्बल तीन वर्षांनंतर ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून, त्यानंतर आता महापालिकेतील विविध कार्यालयांची साफसफाई व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. निवडणूक काळात बंद असलेली महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती तसेच अन्य महत्त्वाची दालने पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

यासोबतच महापालिकेतील विद्युत दुरुस्तीच्या कामांनाही गती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०२२ मध्ये दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेले महासभा सभागृहही आता पुन्हा नव्या नगरसेवकांचा आवाज ऐकण्यासाठी सज्ज होत आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी महापौर व उपमहापौर दालनांची साफसफाई सुरू असून पेस्ट कंट्रोलची कामेही करण्यात येत आहेत. बंद पडलेल्या विविध यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे. विशेष बाब म्हणजे महापौर दालनात १९९६ पासून कार्यरत असलेले शिपाई नव्या महापौरांची तितक्याच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. येत्या एप्रिल महिन्यात विलास ढेरेंगे हे सेवा निवृत्त होणार असून, अनेक महापौरांच्या आठवणी ते सोबत घेऊन जाणार आहेत. नव्या महापौरांना पदभार स्वीकारताना पाहूनच सेवा निवृत्त होण्याची त्यांची इच्छा असल्याचे सांगितले जाते. गटनेते, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेत्यांची दालनेही स्वच्छ व नीटनेटकी करण्याचे काम वेगाने सुरू असून, महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या कामकाजाला सुरुवात होण्याची चाहूल लागली आहे.

महापालिकेतील पक्षीय व प्रशासकीय कार्यालयांची साफसफाई मोहीम सुरू
महापालिकेतील पक्षीय व प्रशासकीय कार्यालयांची साफसफाई मोहीम सुरूछायाचित्र : दीपक कुरकुंडे
महापालिकेतील पक्षीय व प्रशासकीय कार्यालयांची साफसफाई मोहीम सुरू
महापालिकेतील पक्षीय व प्रशासकीय कार्यालयांची साफसफाई मोहीम सुरूछायाचित्र : दीपक कुरकुंडे

चार वर्षांपासून सभागृह बंदच

२०२२ मध्ये या सभागृहाची दुरुस्ती करण्यात आली होती. भविष्यात वाढणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येचा विचार करून आसनक्षमता वाढवणे तसेच इतर डागडुजीची कामे करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर जवळपास चार वर्षे हे सभागृह बंदच होते. आता सभागृहातील विविध ठिकाणी साचलेली मळकटे साफ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच खुर्च्या, वातानुकूलित यंत्रणा आणि इतर सुविधा सुस्थितीत आहेत की नाही, याचीही तपासणी केली जात आहे.

५० टक्के नवीन चेहऱ्यांचा समावेश

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून, ६४९ उमेदवारांपैकी १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये सुमारे ५० टक्के नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे, तर काही अनुभवी नगरसेवक पुन्हा एकदा महापालिकेत दिसणार आहेत. पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी महासभेचे सभागृह हे पूर्णपणे नवीन अनुभव ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in