ठाणे-नाशिक वाहतूक प्रवासाला दिलासा; खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल खुला

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
ठाणे-नाशिक वाहतूक प्रवासाला दिलासा; खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल खुला
ठाणे-नाशिक वाहतूक प्रवासाला दिलासा; खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल खुला
Published on

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवार, २९ एप्रिलपासून या पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू झाली असून ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे-नाशिक मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला होता. औद्योगिक वसाहती, वाढती नागरी वस्ती तसेच समृद्धी महामार्गशी झालेली जोडणी यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी खारेगाव खाडी परिसर, साकेत पूल आणि टोलनाका भागात दररोज वाहतूककोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून पर्यायी मार्गनिर्मिती व उड्डाण पूल उभारणीची योजना राबविण्यात आली.

खारेगाव टोलनाका परिसरात जुन्या साकेत पुलाच्या समांतर हा नवा उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. यामुळे पूर्वी चार लेनची वाहतूक दोन लेनवर येऊन निर्माण होणारी अडचण मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.

ठाणे-नाशिक वाहतूक प्रवासाला दिलासा; खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल खुला
खारेगाव खाडी उड्डाणपूल खुला होणार; ठाणे-मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीला दिलासा

डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे वाहतूककोंडी कमी होण्यासोबतच प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या घटेल. तसेच इंधनाची बचत होऊन पर्यावरणीय दुष्परिणामही कमी होण्यास मदत होईल.

सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच परवानगी

पूर्वी या मार्गावर १० ते १५ मिनिटांचा प्रवास वाहतूककोंडीमुळे अनेकदा ४५ मिनिटे ते तासभर लांबत होता. सकाळी व सायंकाळी पीक अवरमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होत होती. नव्या पुलामुळे वाहतुकीचा प्रवाह विभागला जाईल आणि वाहनांचा वेग कायम राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. पुलाच्या उद्घाटनापूर्वी सर्व आवश्यक तांत्रिक तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. लोड टेस्टिंग प्रक्रियेद्वारे पुलाची वहनक्षमता व सुरक्षितता तपासण्यात आली. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच पुलाला वाहतुकीची परवानगी देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in