ठाणे, नवीमुंबईतील काही भागात बत्तीगुल; नेमकं कारण काय?

ठाणे तसेच नवी मुंबईतील काही भागांमध्ये तांत्रिक कारणामुळे वीज गायब तब्बल २ तासांहून अधिक काळ नागरिकांच्या घरात वीजच नाही
ठाणे, नवीमुंबईतील काही भागात बत्तीगुल; नेमकं कारण काय?

ठाणे शहरातील काही भागातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. तसेच, नवी मुंबईमध्येदेखील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. एकीकडे शहरांमध्ये गरमी वाढत असताना दुसरीकडे वीजपुरवठाच बंद झाल्याने सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खारेगाव कळवा येथील सबस्टेशनची लाईन ट्रिप झाल्यामुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. २ तासांहून अधिक काळापर्यंत खोपट, नौपाडा, कोपरी, बाळकुम आणि अन्य काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला. तसेच दुसरीकडे महापारेषण कंपनीच्या खारघर ते तळेगाव दरम्यान असलेल्या लाईनमध्ये मोठा बिघाड झाल्याने नवी मुंबई शहरात विविध विभागांत दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. पनवेल, खारघर तसेच इतर काही भागांना याचा मोठा फटका वीज ग्राहकांना बसला. दरम्यान, बऱ्याच काळानंतर वाशीसह इतर भागांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in