Thane : नवरात्रौत्सवासाठी २३७ अर्ज, ८० मंडळांना परवानगी

ठाण्यात नवरात्रोत्सवासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळून २३७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ८० मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत परवानगी मिळालेल्या मंडळांकडून मंडप उभारणीला वेग येणार आहे.
Thane : नवरात्रौत्सवासाठी २३७ अर्ज, ८० मंडळांना परवानगी
Thane : नवरात्रौत्सवासाठी २३७ अर्ज, ८० मंडळांना परवानगीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

ठाणे : ठाण्यात नवरात्रोत्सवासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळून २३७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ८० मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत परवानगी मिळालेल्या मंडळांकडून मंडप उभारणीला वेग येणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर मंडप उभारले जातात. त्याचबरोबर विद्युत रोषणाई, सजावट, गरबा-दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, पादचारी मार्ग अडविले जाऊ नयेत तसेच अग्निसुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेच्या नियमांचे पालन होण्यासाठी महापालिकेकडून परवानगीची प्रक्रिया राबविली जाते.

लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीकडे सर्वाधिक ४५ अर्ज दाखल झाले असून यापैकी २२ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ माजिवडा-मानपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर मंडळांनी मंडप परवानगीसाठी अर्ज केले आहेत.

नौपाडा-कोपरी (नौपाडा विभाग) येथे १८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १३ मंडळांना परवानगी मिळाली आहे. वागळे परिसरात १९ अर्ज, वर्तकनगरमध्ये २२ अर्ज, उथळसरमध्ये १९ अर्ज, कळवा येथे २९ अर्ज, तर मुंब्रा परिसरात सहा अर्ज प्राप्त झाले आहेत. दिवा परिसरातही नवरात्रोत्सवासाठी मंडप उभारण्याची तयारी सुरू असून मंडळांकडून परवानगीसाठी अर्ज करण्यात आले आहेत.

परवानगीच्या प्रक्रियेला वेग

नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने मंडळांना मंडप उभारणीसाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांकडून अर्जांची छाननी केली जात आहे. मंडपाची जागा, वाहतुकीवरील परिणाम, अग्निसुरक्षेच्या उपाययोजना तसेच इतर आवश्यक बाबी तपासून परवानगी दिली जात आहे.

दरम्यान, शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वसाहतींमध्ये नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. अनेक मंडळांनी देवीच्या मूर्तीची आरास, मंडपाची सजावट, विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे उर्वरित अर्जांवरही महापालिकेकडून लवकरात लवकर निर्णय होण्याची अपेक्षा मंडळांकडून व्यक्त होत आहे.

नवरात्रोत्सव मंडप परवानगी : ५ ऑक्टोबरपर्यंत

तपशील - संख्या

ऑनलाइन प्राप्त अर्ज - ८०

ऑफलाइन प्राप्त अर्ज - १५७

एकूण अर्ज - २३७

परवानगी दिलेली मंडळे - ८०

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in