Thane : ठाण्यात राष्ट्रवादीला बसणार धक्का; जितेंद्र आव्हाडांचे विश्वासू जाणार शिंदे गटात?

Thane : ठाण्यात राष्ट्रवादीला बसणार धक्का; जितेंद्र आव्हाडांचे विश्वासू जाणार शिंदे गटात?

ठाण्यातील (Thane) राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता आणि जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या

ठाण्यामध्ये (Thane) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राबोडीचे माजी नगरसेवक आणि ठाणे महापालिकेचे गटनेते नजीब मुल्ला (Najib Mulla) हे शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जातात. नजीब मुल्ला यांचा वाढदिवस आहे. अशामध्ये त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अद्याप राष्ट्रवादीकडून किंवा नजीब मुल्ला यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ठाण्यातील मुब्रा परिसरात एक बॅनर लावण्यात आला. मात्र, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांचा फोटो न लावता शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो लावलेले दिसले. यामुळे नजीब मुल्ला हे शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यामध्ये मोठा धक्का मानला जात आहे. नजीब मुल्ला हे अजित पवारांचेही विश्वासू मानले जातात. ते राष्ट्रवादीकडून ठाण्यातील राबोडी भागामध्ये नगरसेवक राहिले आहेत. तर, ठाणे महानगर पालिकेमध्ये गटनेतेही आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in