Thane : पालिकेच्या नऊ प्रभाग समिती सभापतींची निवड; आठ बिनविरोध, मुंब्र्यात राष्ट्रवादीची (शरद पवार) बाजी

मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका अखेर मंगळवारी पार पडल्या.
Thane : पालिकेच्या नऊ प्रभाग समिती सभापतींची निवड; आठ बिनविरोध, मुंब्र्यात राष्ट्रवादीची (शरद पवार) बाजी
Thane : पालिकेच्या नऊ प्रभाग समिती सभापतींची निवड; आठ बिनविरोध, मुंब्र्यात राष्ट्रवादीची (शरद पवार) बाजी
Published on

ठाणे : मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका अखेर मंगळवारी पार पडल्या. नऊ प्रभाग समित्यांसाठी अवघे दहा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आठ प्रभाग समित्यांमध्ये सभापतींची निवड बिनविरोध झाली, तर मुंब्रा प्रभाग समितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि एमआयएम यांच्यात थेट लढत झाली.

मुंब्रा प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या दीपाली भगत आणि एमआयएमचे नफिज अन्सारी यांच्यात सामना रंगला. ठाणे महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रिया पार पडली. १६ सदस्यांपैकी १४ सदस्यांनी मतदान केले. त्यामध्ये दीपाली भगत यांना १० मते मिळाली, तर नफिज अन्सारी यांना ४ मतांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दीपाली भगत यांना विजयी घोषित केले.

दरम्यान, नोपाडा-कोपरी येथे मिनल संखे, वागळे येथे एकता भोईर, कळवा येथे विजया लासे, लोकमान्य सावरकर नगर येथे निर्मला कणसे, दिवा येथे दीपक जाधव, वर्तकनगर येथे जयश्री डेव्हिड आणि उथळसर येथे भाजपचे नारायण पवार यांची बिनविरोध सभापतीपदी निवड झाली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in