अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्याने दोन्ही जिल्हा प्रशासनांनी खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवार, ४ जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी
Published on

ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्याने दोन्ही जिल्हा प्रशासनांनी खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवार, ४ जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच शासकीय, निमशासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने ४ आणि ५ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभागानेही स्वतंत्र आदेश काढून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात ४ आणि ५ जुलै रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट घोषित करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in