अखेर १५५ सफाई कर्मचारी पालिकेत कायमस्वरूपी

वारसा हक्काने ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या १५५ सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती आदेश काढण्यात आले असून त्याबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अखेर १५५ सफाई कर्मचारी पालिकेत कायमस्वरूपी
Published on

ठाणे : वारसा हक्काने ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या १५५ सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती आदेश काढण्यात आले असून त्याबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते. अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाते. या संदर्भात, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आस्थापना विभागाने विशेष मोहीम राबवली.

या मोहिमेत सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यावर १५५ सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आदेश टप्प्याटप्याने निर्गमित करण्यात आले. सफाई कामगारांना देय असलेले सर्व लाभ तत्काळ देण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. महापालिका सेवेत कायम करण्याचा निर्णय झाल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, त्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in