ठाण्यात तीन तडीपार गुन्हेगारांना घेतले ताब्यात

हद्दपारीचे आदेश असतानाही ठाणे शहरात वावरणाऱ्या अर्शद इलियास खान, अजय दिलीप त्रिभुवन आणि रोमी नरेश गवंदे यांना वागळे इस्टेट पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ताब्यात घेतले.
ठाण्यात तीन तडीपार गुन्हेगारांना घेतले ताब्यात
ठाण्यात तीन तडीपार गुन्हेगारांना घेतले ताब्यात
Published on

ठाणे : हद्दपारीचे आदेश असतानाही ठाणे शहरात वावरणाऱ्या अर्शद इलियास खान, अजय दिलीप त्रिभुवन आणि रोमी नरेश गवंदे यांना वागळे इस्टेट पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ताब्यात घेतले.

गुन्हे शोध पथकातील पोलीस १४ ऑगस्टला हद्दीतील पाहिजे व तडीपार आरोपींची तपासणी करीत होते. त्यावेळी हाजुरी चौकातील सार्वजनिक शौचालयाजवळ अरशद खान आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला. तपासात त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये १८ महिन्यांची हद्दपारी असल्याचे निष्पन्न झाले. याच दिवशी मौलाना स्कूलच्या मागे अजय त्रिभुवन हा आढळून आला. त्याच्यावर कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये १८ महिन्यांची हद्दपारी होती. तसेचरोमी गवंदे यालाही पोलिसांनी पकडले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in