Thane : दोन उपायुक्तांसह एसीबी अधीक्षकांना मुदतवाढ

राज्य सरकारने भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांसह ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधीक्षकांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Thane : दोन उपायुक्तांसह एसीबी अधीक्षकांना मुदतवाढ
Thane : दोन उपायुक्तांसह एसीबी अधीक्षकांना मुदतवाढ'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

ठाणे : राज्य सरकारने भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांसह ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधीक्षकांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, एका अधिकाऱ्याची ठाणे शहर पोलीस दलात बदली झाली आहे.

ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि ठाणे एसीबीचे अधीक्षक शिवराज पाटील यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ठाणे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक जयंत जसबळे यांची ठाणे शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)