Thane : ‘घरचा दिवाच विझवला’; दिवाळीत राम पूर्णेकर यांचा आक्रोश, ४२ दिवस उलटूनही तपासाबाबत असमाधान

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रोषणाईचा सण. मात्र, यंदाची दिवाळी पूर्णेकर कुटुंबासाठी दुःखद ठरली आहे.
Thane : ‘घरचा दिवाच विझवला’; दिवाळीत राम पूर्णेकर यांचा आक्रोश, ४२ दिवस उलटूनही तपासाबाबत असमाधान
Thane : ‘घरचा दिवाच विझवला’; दिवाळीत राम पूर्णेकर यांचा आक्रोश, ४२ दिवस उलटूनही तपासाबाबत असमाधान
Published on: 

ठाणे : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रोषणाईचा सण. मात्र, यंदाची दिवाळी पूर्णेकर कुटुंबासाठी दुःखद ठरली आहे. दरवर्षी वडिलांसोबत दिवाळी साजरी करायचो. यंदा तेच नसल्याने घरात दिवा लावण्याचीही इच्छा झाली नाही. माझे वडील हाच आमच्या घराचा दिवा होते. त्यांनाच हिरावून घेतले, आमच्या घरचा दिवाच विझवला, अशा शब्दांत दिवंगत प्रदीप (बाळू दादा) पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वडिलांच्या हत्येला ४२ दिवस उलटूनही तपासाबाबत समाधान नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास अद्याप सुरू आहे. या तपासाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी राम पूर्णेकर यांनी गुरुवारी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात जाऊन विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. तपासाला नवीन माहिती देण्यापेक्षा आतापर्यंत झालेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी ही भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे पुरावे तपास अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येणार असून, त्यानंतर वकिलांशी चर्चा करून त्याबाबत माध्यमांना माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांनी परिसरातील पार्किंगच्या जागेवर होणाऱ्या काही बांधकामांना विरोध केला होता. तसेच पाच मजली इमारतीवर अतिरिक्त मजले उभारण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. संबंधित बिल्डरची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे का? याबाबत मात्र आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने काही प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे राम यांनी सांगितले.

आठवणींनी अश्रू अनावर

वडिलांसोबतच्या दिवाळीच्या आठवणी सांगताना राम पूर्णेकर यांना अश्रू अनावर झाले. गेल्या चार-पाच दिवसांपासून कोणाशीही फारसे बोललेलो नाही. सगळीकडे दिवाळीचा उत्साह असताना आमच्या घरात मात्र दिवा लावण्याचीही इच्छा होत नाही. वडील हेच आमच्या कुटुंबाचा आधार होते. त्यांच्या जाण्याने सणाचा आनंदच हरवला आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. वडिलांच्या हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्ती कोणतीही घटना घडली नसल्याप्रमाणेच वागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)