खासगी रुग्णालयांना आता नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठी मोजावे लागणार जास्त पैसे; जुन्या दरात २५%ने वाढ

शहरातील खासगी रुग्णालयांना यापुढे नवीन नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी अधिकचे शुल्क मोजावे लागणार
खासगी रुग्णालयांना आता नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठी मोजावे लागणार जास्त पैसे; जुन्या दरात २५%ने वाढ

ठाणे: शहरातील खासगी रुग्णालयांना यापुढे नवीन नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी अधिकचे शुल्क मोजावे लागणार आहे. शहरतील खासगी रुग्णालयांची नोंदणी आणि नूतनीकरण शुल्कामध्ये वाढ करण्याच्या निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. तीन वर्षांकरिता हे शुल्क आकारले जाणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चालविली जाणारी खासगी तसेच सरकारी व निमसरकारी रुग्णालये प्रसूतिगृह व डे केअर सेंटर जेथे रुग्णांना भरती केले जाते अशा सर्व आस्थापनांचे नोंदणी व त्यांचे नूतनीकरण बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट अन्वये करण्यात येते. महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांची नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ या वर्षाकरिता महासभेची मान्यता घेण्यात आलेली होती. ही मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपुष्टात येत असल्याने १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढीव फी प्रमाणे नवीन नोंदणी व नूतनीकरण नोंदणी शुल्कात २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव ठाणे महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे.

शहरातील रुग्णालयांच्या भूमिकेकडे लक्ष

नोंदणीसाठी तसेच नूतनीकरणासाठी रुग्णालयातील खाटांनुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या पूर्वनोंदणी किंवा नूतनीकरणासाठी पूर्वी आकारलेल्या शुल्काच्या २५% वाढीव शुल्क आकारले जाणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही या शुल्कवाढीला डॉक्टरांकडून विरोध करण्यात आला होता. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा शुल्कवाढीचा हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून शहरातील रुग्णालये याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खाटांची संख्या जुने दर प्रस्तावित दर

१ ते ५ खाट ३,०००/- ३,७५०/-

६ ते १० खाटा ४,०००/- ५,०००/-

११ ते १५ खाट ५,०००/- ६,२५०/-

१६ ते २० खाटा ७,०००/- ८,७५०/-

२१ ते २५ खाटा १६,०००/- २०,०००/-

२६ ते ५० खाटा ४५,०००/- ५६,२५०/-

५१ ते ७५ खाटा १,०३,०००/- १,२८,७५०/-

७६ ते १०० खाटा २,५०,०००/- ३,१२,५००/-

१०१ ते १५० ६,००,०००/- ७,५०,०००/-

११५१ पासून पुढे १०,००,०००/- १२,५०,०००/-

logo
marathi.freepressjournal.in