Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणात आणखी एक पिस्तूल, दोन चॉपर जप्त

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणखी एक देशी पिस्तूल आणि दोन चॉपर जप्त केले आहेत.
Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणात आणखी एक पिस्तूल, दोन चॉपर जप्त
Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणात आणखी एक पिस्तूल, दोन चॉपर जप्तसंग्रहित छायाचित्र
Published on: 

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणखी एक देशी पिस्तूल आणि दोन चॉपर जप्त केले आहेत. कर्नाळा येथील काले गाव परिसरातील झाडाझुडपांत लपवलेली शस्त्रे आरोपी संतोष कनोजिया याच्या मदतीने बुधवारी रात्री हस्तगत करण्यात आली.

दरम्यान, आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमितसिंग ऊर्फ पपलू यांना ठाणे न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तपासादरम्यान आतापर्यंत दोन पिस्तुले आणि दोन चॉपर जप्त करण्यात आले आहेत. आरोपींचे कपडे, आणखी एक चॉपर, मोबाइल आणि हेल्मेट हस्तगत करायचे असल्याचे पोलीस अधिकारी शैलेश साळवी यांनी न्यायालयात सांगितले. तसेच कुटुंबीयांनी दिलेल्या दोन व्हिडीओंच्या आधारे तपासासाठी तीन दिवसांची कोठडी मागण्यात आली; मात्र न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी मंजूर केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in