Thane : पूर्णेकर हत्याप्रकरणी यादव, पवारला पुन्हा पोलीस कोठडी

ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना ठाणे न्यायालयाने गुरुवारी पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Thane : पूर्णेकर हत्याप्रकरणी यादव, पवारला पुन्हा पोलीस कोठडी
Thane : पूर्णेकर हत्याप्रकरणी यादव, पवारला पुन्हा पोलीस कोठडी
Published on: 

ठाणे : ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना ठाणे न्यायालयाने गुरुवारी पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दोघांची कोठडी १३ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. हल्ल्यासाठी दोन पिस्तूल आणि तीन चॉपरचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे. २९ सप्टेंबरच्या रात्री पूर्णेकर यांच्या कार्यालयात पाच जणांनी गोळीबार करून चॉपरने हल्ला केला होता. गंभीर जखमी पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणात पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि एक हेल्मेटधारी संशयित अद्याप फरार आहेत. पोलिसांनी तीन दुचाकी, एक चारचाकी, एक पिस्तूल आणि मोबाईल जप्त केला आहे. फरार आरोपींचा शोध, शस्त्रांसाठी आर्थिक मदत कोणी केली आणि कटातील अन्य बाबींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी मंजूर केली. दरम्यान, पप्या शिंदेची कोठडी ९ ऑक्टोबरला संपत असल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in