ठाणे स्थानकातून दोन लाखांचे मोबाईल चोरीला

लोकल ट्रेनमधील उसळलेली गर्दी चोरट्यांसाठी संधी ठरत असून, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात चार वेगवेगळ्या घटनांत तब्बल दोन लाखांहून अधिक रुपये किमतीचे चार मोबाईल फोन लंपास झाले आहेत. या सर्व प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : लोकल ट्रेनमधील उसळलेली गर्दी चोरट्यांसाठी संधी ठरत असून, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात चार वेगवेगळ्या घटनांत तब्बल दोन लाखांहून अधिक रुपये किमतीचे चार मोबाईल फोन लंपास झाले आहेत. या सर्व प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, डोंबिवलीतील अर्णव भराडी (२२) हे १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पावणे सात वाजता कल्याण लोकलमध्ये चढत असताना त्यांच्या पॅन्टमध्ये ठेवलेला ४८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला. दुसऱ्या घटनेत, आदित्य गायकवाड यांचा ६५ हजारांचा मोबाईल त्याच दिवशी, त्याच वेळी सीएसटीएम लोकलमध्ये चढताना हातोहात गायब झाला. तिसऱ्या घटनेत, अंधेरी येथील हिदायतुल्लाह खान (३०) हे ३१ ऑगस्ट रोजी ठाणे स्थानकातून कल्याण स्लो लोकलमध्ये चढताना बळी ठरले. कळवा स्थानकावर ट्रेन थांबल्यानंतर त्यांनी पॅन्टमध्ये ठेवलेला ९० हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले.

logo
marathi.freepressjournal.in