ठाणे स्टेशनच्या 'एस्केलेटर'वरुन उतरण्यासाठी प्रवाशाचा तब्बल ५ मिनिटे 'आटापिटा', सरकता जिना संपायचं नावच घेईना! Video व्हायरल

ठाणे रेल्वे स्थानकावर उभे असलेले काही प्रवासी 'एस्केलेटर'वरुन उतरण्याचा आटापिटा हसू आवरुन बघत होते. त्यातीलच एकाने व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
ठाणे स्टेशन 'एस्केलेटर' व्हायरल व्हिडिओ
ठाणे स्टेशन 'एस्केलेटर' व्हायरल व्हिडिओ Reddit
Published on

ठाणे रेल्वे स्थानकावरील एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ठाणे स्थानकावर असलेल्या एस्केलेटरचा वापर करुन एक प्रवासी खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता, पण चक्क विरुद्ध दिशेने. म्हणजेच काय, तर वरती जाणाऱ्या एस्केलेटरवरुन ही व्यक्ती खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होती, पण तरीही आपण विरुद्ध दिशेने आहोत, हे काय त्यांच्या लक्षात आलं नाही...तेही एक, दोन नाही तर तब्बल ५ मिनिट या व्यक्तीचा आटापिटा सुरूच होता.

"ठाणे स्थानकावर या व्यक्तीला बघितले. एस्केलेटरवरुन खाली उतरण्यासाठी त्याला तब्बल ५ मिनिटे लागली, तेही मी रेकॉर्डिंग सुरू केल्यापासून. म्हणजे कितीवेळापासून त्याचा प्रयत्न सुरू होता याची मला उत्सुकता लागलीये", अशा कॅप्शनसह सोशल मीडियावर 'रेडिट' (Reddit) वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

स्थानकावर उभे असलेले काही लोक एस्केलेटरवरुन उतरण्याचा हा प्रयत्न हसू आवरुन बघत होते. तर 'रेडिट' वापरकर्त्याने लपून व्हिडिओ रेकॉर्ड केला. तथापि, ही व्यक्ती खरोखर एस्कलेटरवर अडकली होती की केवळ मजा करत होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही, त्याच्या कृत्याने लोकांचे मनोरंजन केलेच शिवाय व्हायरल देखील झाला.

बघा व्हिडिओ

आता नेटकरी व्हिडिओखाली मजेशीर प्रतिक्रिया देत व्यक्त होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in