

अतुल जाधव/ठाणे
ठाणे शहरात पाणीटंचाई नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात हजारो नागरिकांना आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
विशेषतः घोडबंदर पट्टयातील रहिवाशांना दरमहा हजारो रुपये खर्च करून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर शहरातील काही भागांत दिवसातून दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा होत असल्याने पाणीवाटपातील असमानता पुन्हा चर्चेत आली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मार्च ते जून या अवघ्या १६० दिवसांच्या कालावधीत शहरात तब्बल ९,८३० टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. म्हणजेच दररोज सरासरी १०३ टँकरच्या फेऱ्या झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्याची गंभीर स्थिती अधोरेखित होत आहे.
जलयोजना, एमआयडीसी आणि बारवी धरण, महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून ठाणे शहराला जवळपास ६२५ एमएलडी पाणी उपलब्ध होत असतानाही अनेक भागांमध्ये पाणीटंचाई का आहे, करत आहेत. असा सवाल नागरिक उपस्थित पाण्याची गळती, अनधिकृत जोडण्या, असमतोल वितरण आणि नियोजनाचा अभाव यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र पाणीप्रश्न उपस्थित केला. आव्हाड यांनी ठाण्यातील शहरातील नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे पुराव्यानिशी मांडत, पुरेशा पाणीपुरवठ्याशिवाय नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. ठाणे शहराची दररोजची पाण्याची गरज सुमारे ६३० एमएलडी आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ५९० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात असून, दररोज सुमारे ४० ते ४७ एमएलडी पाण्याची तूट भासत आहे. मुंब्रा आणि दिवा परिसरात सुमारे ४२ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांना लागत नसल्याची माहिती पाणी टँकरवर फारसे अवलंबून राहावे विभागाने दिली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठ्यातील तफावत अधिक ठळकपणे समोर आली आहे.
घोडबंदर पट्टयातील नागरिकांची टँकरवरच भिस्त
पातलीपाडा, कासारवडवली, ओवळा, भायंदरपाडा आणि गायमुख परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर उंच इमारती आणि नवीन गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत असताना त्यानुसार पाणीपुरवठ्याची यंत्रणा उभारण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अनेक गृहसंकुलांमध्ये प्रत्यक्ष पाणीवापराचे शास्त्रीय नियोजन नसल्याने जलवाटपाचा समतोल बिघडल्याचे दिसून येते. पाणीमीटर बसविण्याचा नियम असला, तरी घोडबंदर परिसरात त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे नळाच्या पाण्यासह टँकरसाठीही मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
काही भागांत मुबलक पाणी, तर काही भागांत टंचाई
एकेकाळी पाणीटंचाईचा सामना करणारे वागळे इस्टेट, किसननगर, श्रीनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर परिसर आज तुलनेने सुस्थितीत आहेत. महापालिकेच्या योजनेंतर्गत या भागांना सुमारे ५२ एमएलडी, तर मुंबई महापालिकेच्या योजनेतून किसननगर-भटवाडी भागाला १२ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, कोपरी, मानपाडा, वर्तकनगर, शिवाईनगर आणि वसंत विहार परिसरात दिवसातून अनेक वेळा पाणीपुरवठा होत असताना घोडबंदर पट्टयातील नागरिकांना टँकरशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे पाणीवाटपात समानतेचा अभाव असल्याचा आरोप होत आहे.
तीन केंद्रांतून टँकरद्वारे पाणीपुरवठा
साकेत, मुंब्रा अग्निशमन केंद्र आणि कल्याण फाटा जलकुंभ येथून दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. साकेत जलकुंभातून खासगी टँकरना पाणी भरण्यासाठी शुल्क आकारले जाते, तर महापालिकेच्या टँकरसाठी स्वतंत्र दर निश्चित आहेत. परिणामी, पाणीटंचाईच्या काळात टँकर व्यवसाय तेजीत आला असून त्याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे.