Thane : ॲमेझॉनच्या डेटा सेंटरविरोधात ठाणेकरांचा 'एल्गार'

ठाणे येथील बाळकुम भागात अॅमेझॉनच्या प्रस्तावित डेटा सेंटर विरोधात 'वेक अप ठाणेकर' या संस्थेने दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला.
Thane : ॲमेझॉनच्या डेटा सेंटरविरोधात ठाणेकरांचा 'एल्गार'
Thane : ॲमेझॉनच्या डेटा सेंटरविरोधात ठाणेकरांचा 'एल्गार'(Photo-X)
Published on

ठाणे : येथील बाळकुम भागात अॅमेझॉनच्या प्रस्तावित डेटा सेंटर विरोधात 'वेक अप ठाणेकर' या संस्थेने दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला. हजारो ठाणेकरांनी शनिवारी प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला.

दरम्यान, या सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटरविरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे आंदोलनात पाणी, वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडण्याचा इशारा दिला.

बाळकूम येथील ५३ एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी दररोज १२ दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास ९० डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. याचा त्रास दुष्परिणाम गर्भवती, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे.

गेल्या गुरुवारी 'वेक अप ठाणेकर' शिष्टमंडळाची अॅमेझॉनच्या प्रतिनिधींसोबत ठामपा आयुक्तांच्या दालनात बैठकही पार पडली होती. मात्र, अॅमेझॉनकडून दिशाभूल केली जात असल्याने वेक अप ठाणेकरने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते.

सर्व परवानग्यांचे पालन करूनच वृक्षतोड

सर्व नियमांचे पालन करूनच प्रकल्पाची अंमलबजावणीठाण्यातील डेटा सेंटर प्रकल्पासाठी करण्यात आलेली वृक्षतोड सर्व कायदेशीर परवानग्या आणि ठाणे महापालिकेच्या मंजुरीनंतरच करण्यात आल्याचे अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात अधिक स्थानिक प्रजातींची झाडे लावली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरणीय मंजुरींचे पालन करण्यात येत असून माहिती 'परिवेश' पोर्टलवर उपलब्ध आहे. डेटा सेंटरसाठी स्वतंत्र उच्च-दाब वीज उपकेंद्र उभारले जाणार असून स्थानिक वीज ग्रीडवर ताण येणार नाही. तसेच, शीतकरणासाठी स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा कंपनीने केला.

ठाण्याचे तापमान वाढणार

आठपेक्षा जास्त मोठे गृहनिर्माण संकुल, पाच शाळा आणि तीन रुग्णालये आहेत, ज्यात प्रकल्पाच्या जागेपासून ४०० मीटरच्या आत बाल रुग्णालयाचाही समावेश आहे. गेले अनेक दिवस ठाण्याचा पारा चाळीशी गाठत आहे. आता या डेटा सेंटरमुळे आसपासच्या भागातील तापमान ३ ते ५ सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. हे धोकादायक आहे, कारण स्थानिक रहिवाशांशी याबाबत कोणतीही सल्लामसलत केलेली नाही आणि या डेटा सेंटरमुळे आरोग्याला गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असे प्रधान म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in