पंढरपूर यात्रेसाठी एसटीचा ठाणे विभाग सज्ज

यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे. त्यानिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून १३ ते २२ जुलै कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे. त्यानिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून १३ ते २२ जुलै कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

ठाणे विभागाकडून ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड आणि बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून १३ जुलैपासून गाड्या सोडण्यात येणार आहेत. १७ ते २२ जुलैपासून चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर येथून परतीची वाहतूक सुरू होणार आहे. सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण संगणकीय आणि ग्रुप पद्धतीने उपलब्ध होणार असल्याची महिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून देण्यात आली आहे. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बस स्थानकावर करण्यात आली आहे. भाविकांनी संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसनी प्रवास करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्य शासनाकडून विविध सवलती

राज्य शासनाकडून एसटी परिवहन प्रवाशांसाठी ७५ वर्षेवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. तरी भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसेसने प्रवास करून संबंधित सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांकडून करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in