

ठाणे : गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी महत्त्वाची असलेली एबीजी (आर्टिरियल ब्लड गॅस) तपासणी मशीन आठ महिन्यांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उघडकीस आला आहे. अतिरिक्त आयुक्त-२ मेजर डॉ. नितीन राठोड यांनी अचानक केलेल्या पाहणीत हा प्रकार समोर आला.
आठ महिने ही मशीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नव्हती. डॉ. राठोड यांनी नाराजी व्यक्त करताच मशीन सुरू करण्यासाठी तातडीने हालचाली झाल्या. अखेर ही मशीन कार्यान्वित झाल्याने गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे ठाण्यासह मुंब्रा, दिवा, कळवा, कल्याण, उल्हासनगर आणि शहापूर परिसरातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी महत्त्वाचे उपचार केंद्र गंभीर रुग्णांसाठी मशीन आवश्यक एबीजी मशीनच्या माध्यमातून रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पीएच आणि अन्य महत्त्वाच्या घटकांची तपासणी केली जाते. विशेषतः अतिदक्षता विभागातील आणि श्वसनाचा त्रास असलेल्या गंभीर रुग्णांच्या उपचारांची दिशा ठरविण्यासाठी ही तपासणी महत्त्वाची असते. त्यामुळे ही मशीन आठ महिने बंद असणे ही बाब आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी मानली जात आहे.
गंभीर रुग्णांसाठी मशीन आवश्यक
एबीजी मशीनच्या माध्यमातून रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पीएच आणि अन्य महत्त्वाच्या घटकांची तपासणी केली जाते. विशेषतः अतिदक्षता विभागातील आणि श्वसनाचा त्रास असलेल्या गंभीर रुग्णांच्या उपचारांची दिशा ठरविण्यासाठी ही तपासणी महत्त्वाची असते. त्यामुळे ही मशीन आठ महिने बंद असणे ही बाब आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी मानली जात आहे.