Thane : मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात शिवसेना उपविभागप्रमुखाची हत्या; हे कारण आले समोर

ठाण्यामध्ये (Thane) शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांच्यावर चॉपरसारख्या हत्याराने हल्ला करण्यात आला
Thane : मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात शिवसेना उपविभागप्रमुखाची हत्या; हे कारण आले समोर

ठाण्यामधून (Thane) एक मोठी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री शिवसेनेचे (शिंदे गट) उपविभागप्रमुख रवी परदेशी (Ravi Pardeshi) यांच्यावर काही फेरीवाल्यांनी चॉपरसारख्या हत्याराने डोक्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या परदेशींना तातडीने ज्युपीटर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघानां अटक केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे.

रवींद्र परदेशी यांची नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती केली होती. ठाण्यामधील मुख्य बाजार पेठेत त्यांचा कटलरीचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा काही फेरीवाल्यांशी वाद सुरु होता. यानंतर रविवारी रात्री ते घरी जात असताना गाडीवरुन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना अडवून त्यांच्यावर चॉपरने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना ज्युपीटर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. यासंदर्भात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in