ठाणे : एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक; चालक, वाहकासह ११ प्रवासी जखमी

घोडबंदर रोडवर दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे : एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक; चालक, वाहकासह ११ प्रवासी जखमी
Published on

ठाणे : घोडबंदर रोडवर दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ओवळा सिग्नलजवळ एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकल्याची घटना घडली. या अपघातात वाहक आणि चालक यांच्यासह बसमधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांवर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली. आंबेजोगाई येथून बोरिवलीच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतूक करत होती. त्यामध्ये वाहक आणि चालकासह एकूण १३ प्रवासी प्रवास करत होते. ही बसगाडी सोमवारी पहाटे ५.३० घोडबंदर येथील ओवळा नाका परिसरात आली असता, बसगाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या धडकेमध्ये बसगाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या दुर्घटनेतील जखमींवर ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मेट्रोच्या कामामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

logo
marathi.freepressjournal.in