ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या ठाणे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्थानक विस्ताराचे काम हाती घेतले आहे. विशेषतः धीम्या मार्गिकेवरील फलाट क्रमांक२, ३ आणि ४ यांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या विस्तारामुळे लवकरच या फलाटांवर १५ डब्यांच्या लोकल गाड्यांना थांबा देता येणार.
ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरूछायाचित्र : विजय गोहिल
Published on

ठाणे : मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या ठाणे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्थानक विस्ताराचे काम हाती घेतले आहे. विशेषतः धीम्या मार्गिकेवरील फलाट क्रमांक२, ३ आणि ४ यांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या विस्तारामुळे लवकरच या फलाटांवर १५ डब्यांच्या लोकल गाड्यांना थांबा देता येणार असल्यामुळे प्रवाशांची गर्दीपासून सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मध्य रेल्वे मार्गावर एक्स्प्रेस, वातानुकुलित आणि सामान्य लोकल गाड्यांची वाहतूक होत असते. एक्स्प्रेस गाड्यांसाठी ५,६,७ आणि ८ मार्ग देण्यात आले आहे. त्याचबरोबर ५ आणि ६ स्थानकावरून जलग लोकल गाड्या धावत असल्यामुळे त्या स्थानकांची लांबी आधीच वाढविण्यात आली आहे. मात्र सध्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता १५ डब्यांच्या लोकलची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तसेच सध्या या फलाटांची लांबी कमी असल्याने १५ डब्यांच्या लोकल गाड्या पूर्णपणे थांबविणे शक्य होत नव्हते. परिणामी प्रवाशांना चढण्या-उतरण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तसेच गर्दीमुळे अनेक प्रवाशांचे जीव गेल्याच्या घटना घडत असतात. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा म्हणून रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म वाढविणे, उंची वाढविणे आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खासकरून धीम्या गतीच्या स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल धावतील या उद्देशाने फलाट क्रमांक २, ३ आणि ४ यांची लांबी वाढविण्याचे काम सुरू असून प्लॅटफॉर्म उंचावणे आणि नवीन फरशी टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी रेल्वेने कामगारांची विशेष पथके नियुक्त केली असून, दिवसरात्र काम चालू ठेवून प्रवासी हालचालीवर परिणाम होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.

गर्दीवर नियंत्रण मिळवता येणार

दररोज सुमारे सात लाख प्रवासी ठाणे स्थानकातून प्रवास करतात. सकाळी व सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पावसाळ्यात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यास चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन, प्रवाशांची सुरक्षितता आणि भविष्यातील वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार करून हा विस्तार प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रवाशांना सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल

ठाणे स्थानकावरील विस्तारकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक सुविधा उभारल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. ही कामे डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विस्तारामुळे ठाणे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन सुकर होईल आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in