प्रवाशाची वाहकाला बेदम मारहाण; महिलांच्या रांगेतून घुसखोरी; ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे महानगर परिवहन (टीएमटी) बसमध्ये महिलांच्या रांगेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला जाब विचारल्याच्या रागातून वाहकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सिडको बसथांब्यावर घडली.
प्रवाशाची वाहकाला बेदम मारहाण; महिलांच्या रांगेतून घुसखोरी; ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रवाशाची वाहकाला बेदम मारहाण; महिलांच्या रांगेतून घुसखोरी; ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे महानगर परिवहन (टीएमटी) बसमध्ये महिलांच्या रांगेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला जाब विचारल्याच्या रागातून वाहकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सिडको बसथांब्यावर घडली. या हल्ल्यात वाहकाच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीएमटीमध्ये २०१७ पासून वाहक म्हणून कार्यरत असलेले सुरेश राठोड (४५) हे सिडको बसथांबा ते काल्हेर (भिवंडी) मार्गावरील बसवर कर्तव्य बजावत होते. रात्री सुमारे ९.५० वाजता शेवटची फेरी सुरू होत असताना बसथांब्यावर मोठी गर्दी होती. त्यामुळे राठोड यांनी महिलांना पुढील प्रवेशद्वारातून, तर पुरुषांना मागील प्रवेशद्वारातून बसमध्ये चढण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी एक पुरुष प्रवासी महिलांच्या रांगेतून पुढील दरवाजाने बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. राठोड यांनी त्याला नियमांचे पालन करण्यास सांगत जाब विचारताच तो संतापला. त्याने शिवीगाळ करत राठोड यांच्यावर हल्ला केला. उपस्थित प्रवाशांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोघांनाही ठाणेनगर पोलीस ठाण्यात नेले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in