दिवाळीत ठाणे परिवहनचे दिवाळे; प्रवासी संख्येत झाली घट; चार दिवसांत तब्बल ३२ लाखांचे नुकसान

दिवाळी सणाच्या काळात ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गावी रवाना झाल्याने ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सणाच्या चार दिवसांत प्रवाशांची संख्या घटल्यामुळे परिवहन सेवेचे सुमारे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवाळीत ठाणे परिवहनचे दिवाळे; प्रवासी संख्येत झाली घट; चार दिवसांत तब्बल ३२ लाखांचे नुकसान
दिवाळीत ठाणे परिवहनचे दिवाळे; प्रवासी संख्येत झाली घट; चार दिवसांत तब्बल ३२ लाखांचे नुकसान
Published on

ठाणे : दिवाळीत प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या काळात ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गावी रवाना झाल्याने ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सणाच्या चार दिवसांत प्रवाशांची संख्या घटल्यामुळे परिवहन सेवेचे सुमारे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

१८ ऑक्टोबर रोजी ८ हजार २८१ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून २७ लाख २९ हजार ९९९ रुपयांचे उत्पन्न टीएमटीला मिळाले होते. परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली. २० ऑक्टोबर (अभ्यंग स्नान) रोजी फक्त २ हजार ५१० प्रवाशांनी प्रवास केला आणि त्यातून १८ लाख १३ हजार ३४९ रुपये इतकेच उत्पन्न मिळाले. २१ ऑक्टोबर (लक्ष्मीपूजन) रोजी २ हजार ७२१ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून १९ लाख ७२ हजार ८२६ रुपये, २२ ऑक्टोबरला ३ हजार ४५९ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून १५ लाख ९२ हजार ८४० रुपये, तर २३ ऑक्टोबरला ३ हजार १४४ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून १९ लाख ९० हजार १०२ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते.

सणासुदीच्या काळात नागरिक गावी जाणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालविण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत घट होते. परिणामी, नेहमीपेक्षा कमी तिकीट विक्री झाली आणि आर्थिक तुटीचा फटका ठाणे परिवहन सेवेला बसला.

परिवहन सेवा ही ठाणेकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. अनेक जण या बसमधून नियमित प्रवास करत असतात. नोकरीनिमित्त अनेक ठाणेकर या परिवहन सेवेच्या बसना पसंती देतात. त्यामुळे टीएमटीच्या तिजोरीत दररोज २६ ते २७ लाखांचे उत्पन्न जमा होत असते. मात्र दिवाळीत त्यात मोठी घट नोंदवली गेली आहे. दररोज २६ ते २७ लाख जमा होणारे हे उत्पन्न आता जवळपास ८ लाखांनी घटल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. दररोजचे हे उत्पन्न १८ ते १९ लाखांवर घसरले आहे. त्यामुळेया कालावधीत टीएमटीचे मोठे नुुकसान होत आहे.

दरम्यान सुट्ट्यांमुळे फिरायला गेलेले ठाणेकर घरी परतल्यानंतर या प्रवासी संख्येत पुन्हा वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दररोज सात लाखांचे नुकसान

सामान्य दिवसांत टीएमटीला दररोज सरासरी २६ ते २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र यंदा दिवाळीच्या काळात हे उत्पन्न घटून १८ ते १९ लाखांच्या दरम्यान पोहोचले. परिणामी दररोज सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान परिवहन सेवेच्या तिजोरीत झाले.

logo
marathi.freepressjournal.in