Thane Traffic Update : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभेमुळे आज वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

ठाणे वाहतूक पोलिसांनी सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.
Thane Traffic Update : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभेमुळे आज वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
Published on

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आज ठाण्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात पहिल्यांदाच संयुक्त सभा होत आहे. ही सभा गडकरी रंगायतन परिसरातील मूस चौक येथे पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

कोणते रस्ते बंद? व वळण मार्ग

१) टॉवर नाका – गडकरी सर्कल मार्ग

  • टॉवर नाकाकडून गडकरी सर्कलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक टॉवर नाक्याजवळच थांबवली जाणार

  • सदर भागाकडे जाणाऱ्या वाहनांनी जांभळी नाका → स्टेशन रोड → डॉ. मुस चौक मार्गे इच्छित स्थळी जावे

२) डॉ. मुस चौक ते गडकरी सर्कल

  • हॉटेल साईकृपा येथे गडकरी सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

  • वाहनचालकांनी हॉटेल साईकृपाजवळून उजवीकडे वळून राम मारुती रोड मार्गे पुढे जावे

गडकरी सर्कल परिसरात अतिरिक्त निर्बंध

  • पु. ना. गाडगीळ चौक व ग्रीन लिफ्ट हॉटेल मार्गे गडकरी सर्कलकडे येणारी वाहतूक पूर्णतः बंद

  • ग्रीन लिफ्ट हॉटेलकडून प्रवेश पूर्णतः बंद

  • पर्यायी मार्ग : हॉटेल साईकृपा – राम मारुती रोड/डॉ. मुस चौक

शाळा परिसरात वाहतूक नियंत्रण

  • गजानन महाराज चौक ते दगडी शाळा मार्गावरील वाहतूक गजानन महाराज चौकातच रोखली जाणार

  • वाहनचालकांनी राम मारुती रोडने सरळ जावे किंवा तीन पेट्रोल पंपाजवळून उजवीकडे वळावे

  • दगडी शाळा ते सेंट जॉन्स शाळा ते आम्रपाली बार हा संपूर्ण रस्ता सर्व वाहनांसाठी बंद

  • हलकी वाहने सेंट जॉन्स शाळेसमोरून इच्छित स्थळी जातील

  • जड वाहने व बसेस अल्मेडा सिग्नल → तीन पेट्रोल पंप → हरि निवास मार्गे वळवण्यात येतील

पार्किंगला पूर्ण मनाई

खालील मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहन पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे:

  • चिंतामणी चौक ते गडकरी सर्कल (तलावाची बाजू)

  • सेंट जॉन्स शाळेच्या पाठीमागील रस्ता

  • राम मारुती रोड (गजानन महाराज चौक ते गोखले रोड)

  • हॉटेल साईकृपा ते SBI कॉर्नर

  • गजानन महाराज चौक ते दगडी शाळा चौक

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना प्रवासाचे आधी नियोजन करण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in