"राज्याचे मुख्यमंत्री की..." ठाणे मारहाण प्रकरणावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह रुग्णालयात जाऊन मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेची घेतली भेट
"राज्याचे मुख्यमंत्री की..." ठाणे मारहाण प्रकरणावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"ठाण्याची ओळख म्हणजे महिलांचे संरक्षण ठाणे अशी होती पण आता गुंडगिरीची ठाणे अशी ओळख होऊ लागली आहे. आता यांना गुंडमंत्री म्हणायचं का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच, "देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा." अशी टीका त्यांनी यावेळी केली. "उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचा लाळघोटेपणा सुरु आहे. फडणवीसांमध्ये हिमंत असेल तर आयुक्तांवर कारवाई करा," असा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर आता या क्षणाला यांची ठाण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून गुंडगिरी मुळासकट उपटून फेकून देऊ शकतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहीलेली नाही. मिंधे गटाची गुंडगिरी वाढत चालली आहे. देवेंद्र फडणवीसांना हे झेपत नसेल तर त्यांनी जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडावा." अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, आज ठाण्यातील संपदा रुग्णालयात जाऊन उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदेची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेत

logo
marathi.freepressjournal.in