Thane : महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; UPSC परीक्षेत १० विद्यार्थी यशस्वी; महापौर व आयुक्तांकडून अभिनंदन

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील १० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Thane : महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; UPSC परीक्षेत १० विद्यार्थी यशस्वी; महापौर व आयुक्तांकडून अभिनंदन
Thane : महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; UPSC परीक्षेत १० विद्यार्थी यशस्वी; महापौर व आयुक्तांकडून अभिनंदनप्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील १० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे महापौरांनी नमूद केले.

ठाणे महापालिकेद्वारे संचलित ही संस्था यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था असून येथून यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शासनाच्या विविध सेवांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.

दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि संस्थेच्या मार्गदर्शनाला दिले असून भविष्यात आयएएस, आयपीएस, आयआरएस तसेच इतर केंद्रीय सेवांमध्ये कार्य करत देशसेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेत सुमारे १४० विद्यार्थ्यांची बॅच असून विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये स्टायपेंड, वसतिगृहाची सुविधा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्वांगीण मार्गदर्शन दिले जाते. देशातील महापालिकांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी असे दर्जेदार प्रशिक्षण देणारी ठाणे महानगरपालिका ही अग्रणी संस्था आहे.

-महादेव जगताप, संस्थेचे संचालक

यशस्वी विद्यार्थ्यांची यादी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दिपाली महतो (रैंक ३६), अंकिता पाटील (रैंक १४०), अभिषेक मगदूम (रैंक ४४९), धनंजय दिघे (रैंक ५२९), पारस मेस्त्री (रैंक ५५५), अविष्कार डेर्ले (रैंक ५९१), सिद्धार्थ तगड (रैंक ६१९), शिवम वखारे (रॅक ६५१), मनीष झेंडे (रैंक ७८८) आणि प्रणव बेंढारी (रॅक ९२६) यांनी उल्लेखनीय यश मिळवले. हे सर्व विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत नियमित प्रशिक्षण घेत होते.

logo
marathi.freepressjournal.in