Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूट

वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या पाण्याच्या मागणीमुळे ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर भविष्यातील संकटाचे सावट गडद होत आहे. सध्या शहराची पाण्याची मागणी ६२१ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) असताना प्रत्यक्षात ५९० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.
Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूट
Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूटप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

ठाणे : वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या पाण्याच्या मागणीमुळे ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर भविष्यातील संकटाचे सावट गडद होत आहे. सध्या शहराची पाण्याची मागणी ६२१ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) असताना प्रत्यक्षात ५९० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे ३१ एमएलडीची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे महापालिकेने आता बृहन्मुंबई महापालिकेकडे पिसे-बंधारा येथून दररोज ५० एमएलडी कच्चे पाणी देण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी २९ जुलै रोजी मुंबई महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र पाठविले आहे. या प्रस्तावावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली असून, प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असल्याचे नमूद केले. ठाणे शहराची २०२५ मधील लोकसंख्या सुमारे २९.८१ लाख असून सध्या ठाणे महापालिकेला स्वतःच्या योजनेतून २५० एमएलडी, स्टेमकडून ११५ एमएलडी, एमआयडीसीकडून १३५ एमएलडी आणि मुंबई महापालिकेकडून ९० एमएलडी असा एकूण ५९० एमएलडी पाणीपुरवठा होतो.

मात्र जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवूनही भातसा धरणातून कच्चे पाणी उचलण्याचा कोटा २५० एमएलडी आहे. त्यामुळे अतिरिक्त क्षमतेचा वापर करण्यासाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे.

कच्च्या पाण्याचा प्रश्न कायम

अमृत २.० अंतर्गत ठाणे महापालिकेने टेमघर जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. विद्यमान २८० एमएलडी क्षमतेऐवजी केंद्राची क्षमता ३३६ एमएलडीपर्यंत वाढणार आहे. त्यासाठी ९०० अश्वशक्तीच्या आठ पंपांऐवजी १२७० अश्वशक्तीचे आठ पंप बसविण्यात येत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in