धरणे तुडुंब तरी, पाणी टंचाई 'गाळा'त! ठाणे शहरातील पाणी टंचाईची झळ कायम; पिसे, शहाड उदंचन केंद्रात गाळ साचला

संततधार मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या जलपातळीत वाढ होऊन धरणे तुडुंब भरून चालली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणारे भातसा धरण भरले आहे, तिकडे बारवी भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. तरीही ठाणे शहरातील पाणीकपात अद्यापही रद्द झालेली नाही.
धरणे तुडुंब तरी, पाणी टंचाई 'गाळा'त! ठाणे शहरातील पाणी टंचाईची झळ कायम; पिसे, शहाड उदंचन केंद्रात गाळ साचला
धरणे तुडुंब तरी, पाणी टंचाई 'गाळा'त! ठाणे शहरातील पाणी टंचाईची झळ कायम; पिसे, शहाड उदंचन केंद्रात गाळ साचलाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : संततधार मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या जलपातळीत वाढ होऊन धरणे तुडुंब भरून चालली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणारे भातसा धरण भरले आहे, तिकडे बारवी भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. तरीही ठाणे शहरातील पाणीकपात अद्यापही रद्द झालेली नाही.

मुसळधार पावसाने पिसे आणि शहाड जलउदंचन केंद्रांमध्ये कचरा, तसेच वाहून आलेल्या गाळाचा परिणाम ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला असून शहरातील रोज २० दशलक्ष लिटर कमी पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

जून महिना संपेपर्यंत शहरातील अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर जुलैमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणे भरू लागल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. ठाणे शहराला मुंबई पालिकेकडून ९०, एमआयडीसी १३५, स्टेम ११५ आणि पालिकेच्या स्वत:चे २५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटला होता. त्यामुळे ठाण्यासह परिसरातील शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली होती.

अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती. परंतु पुरेसा पाऊस झाल्यानंतर शहरातील पाणी टंचाई अद्यापही दूर झालेली नाही. शहरातील घोडबंदरसह इतर भागात आजही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. धरणे भरल्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा ठाणेकरांना होती. परंतु पिसे आणि शहाड येथील अशुद्ध जलउद्वहन केंद्रांवरील पंपांमध्ये हा गाळ अडकल्याने पाणी उपशावर थेट परिणाम झाला आहे.

२० दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, सध्या शहराला २० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. धरणे भरत आली असली तरी पाणी कपात रद्द झालेली नाही. त्यात पिसे उंदचन केंद्राजवळ कचरा, गाळ साठल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचेही ठाणे महापालिकेने स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in