ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

ठाणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याच्या समस्येवर अखेर पालिकेने उत्तर शोधले असून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या पासून खत निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ओल्या कचऱ्यावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानुसार गायमुख, नागला बंदर, डायघर आणि आतकोली येथे आता टप्याटप्याने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती
ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याच्या समस्येवर अखेर पालिकेने उत्तर शोधले असून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या पासून खत निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ओल्या कचऱ्यावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानुसार गायमुख, नागला बंदर, डायघर आणि आतकोली येथे आता टप्याटप्याने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून पहिला प्रकल्प गायमुख येथे सुरू होणार असून याठिकाणी १०० मेट्रीक टन कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ११०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. यात ओल्या कचऱ्याचे प्रमाण जवळ जवळ ६० टक्के एवढे आहे. तर ४० टक्के सुका कचरा आहे. परंतु कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावण्यात पालिकेला अद्यापही फारसे यश आलेले नाही. परंतु सद्यस्थितीत हिरानंदानी इस्टेट, कोलशेत आणि साकेत या भागात ८० आणि कौसा येथे १० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु उर्वरीत कचऱ्याचा प्रश्न अद्यापही सुटु शकलेला नाही. महापालिका सध्या भिवंडी येथील आतकोली भागात शहरातील कचरा टाकत आहे.

६०० मेट्रीक टन घनकचरा पूर्व प्रक्रिया प्रकल्प

भविष्यात सुरू होणाऱ्या वीज आणि कोळसा निर्मिती प्रकल्पापूर्वी याठिकाणी आता ६०० टीपीडी (६०० मेट्रीक टन दर दिवशी) या क्षमतेचा घनकरचापूर्व प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यासाठी पुढील १० वर्षांसाठीची निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर आता याचे कायार्देश देण्यात आले असून कामाला देखील सुरवात झाल्याची माहिती महापालिकेने दिली. यासाठी ६७ कोटींचा खर्च केला जात आहे. याठिकाणी ६०० मेट्रीक टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानुसार याचा प्लान्ट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुमारे पाच ते सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या घनकचरापूर्व प्रक्रिया प्रकल्पातून प्लास्टीक व इतर वस्तु या वेगळ्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्यात कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाणार असून त्यापासून वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

गायमुख येथे १०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया

घोडबंदर भागातील गायमुख येथील जकात नाक्याच्या जागेवर कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प आकार घेत आहे. प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून ५० कोटींचा निधी मंजुर झाला असून प्रत्यक्षात कामालाही सुरवात झाली आहे. गायमुख जकात नाका परिसराचे एकूण क्षेत्रफळ ४८०० चौ.मी इतके असून त्यापैकी ४१८० चौ.मी जागेवर कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निमीर्ती करण्याचे नियोजन आहे. याशिवाय नागला बंदल येथे देखील १०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

डायघरला ३०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया

डायघर येथे महापालिका सद्यस्थितीत कचरा टाकत नसली तरी देखील या ठिकाणी महापालिका आता ३०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. याठिकाणी ब्रिक्स तयार केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

घोडबंदरपासून सुरूवात

घोडबंदर भागातील गायमुख येथे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार आता घोडबंदर भागातील गृहसंकुले आणि येथील रहिवाशांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा करुन घेतला जाणार आहे. तसेच महापालिकेच्या माध्यमातून देखील तशाच पध्दतीने त्या कचऱ्याची वाहतुक करणार आहे. शिवाय ओला कचरा रोजच्या रोज व सुका कचरा आठवड्यातून दोन ते तीन दिवस उचलला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in