लग्नास नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण; घर पेटवण्याचाही प्रयत्न; ठाण्यातील धक्कादायक घटना

तरुणासह त्याच्या आई आणि दोन बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी ही अंबिकानगर येथे राहते. यश जाधव उर्फ रघु याच्याशी तिची ओळख होती. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्याने प्रेम व्यक्त केले होते; मात्र तिने त्यास स्पष्ट नकार दिला होता.
लग्नास नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण; घर पेटवण्याचाही प्रयत्न; ठाण्यातील धक्कादायक घटना
Published on

ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणीला मारहाण करत तिचे घर पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तरुणासह त्याच्या आई आणि दोन बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुणी ही अंबिकानगर येथे राहते. यश जाधव उर्फ रघु याच्याशी तिची ओळख होती. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्याने प्रेम व्यक्त केले होते; मात्र तिने त्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतरही यश याने वारंवार लग्नासाठी दबाव टाकत होता. याबाबत तिने व तिच्या आईने काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी जाऊन समज दिली होती. तरीदेखील त्याचा छळ सुरूच राहिला. २४ एप्रिल रोजी रात्री सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास यश हा आपल्या आई मिना, बहीण मयुरी व आत्येबहीण सोनल यांच्यासह तिच्या घराखाली आला. त्याने तिला खाली बोलावून ‘लग्नास नकार का दिला’ या कारणावरून शिवीगाळ करत तिला मारहाण केली. त्याच्या आई व बहिणींनीही तिला मारहाण करत शिवीगाळ केली.

यावेळी तिचे आई-वडील तिला वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. तसेच ‘जीवे मारून टाकू आणि घर जाळून टाकू’ अशी धमकी दिली. मुलीचे कुटुंब तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघाले असता, यश जाधव हा ज्वलनशील पदार्थाने भरलेली बाटली घेऊन परत आला. त्याने जिना चढून तिच्या घराच्या दरवाजावर ज्वलनशील पदार्थ ओतून काडीपेटीने आग लावली. यावेळी त्याच्या आई व बहिणींनीही घर जाळण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणीच्या वडिलांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. दरम्यान, ते चौघे घटनास्थळावरून पसार झाले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्या आगीवर नियंत्रण मिळवले.

लग्नासाठी दबाव

सुमारे पाच वर्षांपूर्वी त्याने प्रेम व्यक्त केले होते; मात्र तिने त्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतरही यश याने वारंवार लग्नासाठी दबाव टाकत होता. याबाबत तिने व तिच्या आईने काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी जाऊन समज दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in