Thane : चौथ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

ठाण्यातील लुइसवाडी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय संतोष गिरी या तरुणाने मंगळवारी (दि. २) सकाळी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सकलया अपार्टमेंटमध्ये घडली.
Thane : चौथ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : ठाण्यातील लुइसवाडी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय संतोष गिरी या तरुणाने मंगळवारी (दि. २) सकाळी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सकलया अपार्टमेंटमध्ये घडली. संतोष गिरी हा आपल्या आईसोबत लुईसवाडी येथे राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही पत्नीपासून त्याचा घटस्फोट झाल्यानंतर ताे नैराश्याखाली होता. तसेच त्याला मद्यपानाची सवयही होती.

मंगळवारी सकाळी जोराचा आवाज आला, त्यानंतर इमारतीतील रहिवासी धावून गेले असता संतोष गिरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याला तत्काळ ठाणे सिव्हील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले की, आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तपासादरम्यान समजले की त्याच्या दोन पत्नी होत्या, परंतु नंतर त्या दोघीही त्याला सोडून गेल्या. तो वारंवार दारूच्या नशेत असे.

logo
marathi.freepressjournal.in