ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, आज अनेक भागांत पाणीपुरवठा बंद

पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, आज अनेक भागांत पाणीपुरवठा बंद
प्रातिनिधिक फोटो
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी, ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा आज शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यत २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in