१७ लाखांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक

भाईंदर पश्चिमेस खाऊगल्ली, अल्पेश इमारतीत चिराग अनडा यांचे मोबाईलचे दुकान आहे. चोरट्याने भिंतीलगत असलेले लोखंडी ग्रील व प्लाय तोडून त्यावाटे दुकानात शिरून १६ लाख ७१ हजर रुपयांचे नवे २४ मोबाईल चोरून नेले होते.
१७ लाखांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक

भाईंंदर : भाईंदरमधील दुकान फोडून त्यातून १६ लाख ७१ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला मीरा-भाईंदर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेले २४ पैकी १४ लाख ५६ हजार रुपयांचे २२ मोबाईल हस्तगत केले आहेत.

भाईंदर पश्चिमेस खाऊगल्ली, अल्पेश इमारतीत चिराग अनडा यांचे मोबाईलचे दुकान आहे. चोरट्याने भिंतीलगत असलेले लोखंडी ग्रील व प्लाय तोडून त्यावाटे दुकानात शिरून १६ लाख ७१ हजर रुपयांचे नवे २४ मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा फिरोज ऊर्फ मोनु नईम खान (२९) असल्याचे निष्पन्न झाले. फिरोज हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बिजनौर, तहसील नजिबाबादमधील अकबराबाद गावचा आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने त्याला दिल्लीतून अटक केली. त्याने भाईंदर येथील मोबाईल दुकान फोडून चोरलेल्या २४ मोबाईल पैकी २२ मोबाईल पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहे. त्याची किमत १४ लाख ५६ हजार ३०० रुपये इतकी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in