ठाण्यातून हद्दपार केलेल्या आरोपीला अटक

आरोपीस ठाण्यासह मुंबई शहर, मुंबई उपनगर व नवी मुंबई परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती
ठाण्यातून हद्दपार केलेल्या आरोपीला अटक

ठाणे : ठाण्यातून हद्दपार आरोपीला बुधवारी रात्री वर्तकनगर पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या. समीर बळीराम पाटील ऊर्फ एस.पी. (वय २९ वर्षे, रा. लोकमान्यनगर पाडा नं.४, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी समीर पाटील उर्फ एसपी यास पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ यांनी २ जून, २०२२ रोजी दोन वर्षांकरिता आरोपीस ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, व नवी मुंबई परिसरातून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपीस ठाण्यासह मुंबई शहर, मुंबई उपनगर व नवी मुंबई परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती; मात्र बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाला आरोपी समीर हा पोलीस आदेशाचे उल्लंघन करीत पाठारे चाळ, लोकमान्यनगर पाडा नं.४, ठाणे पश्चिम येथे वास्तव्य करताना आढळला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in