खाडीत बुडालेल्या वडिलांचा ४८ तासांनंतर मृतदेह सापडला

जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने मृतदेह खाडीबाहेर आणला. या मृतदेहाची ओळख नातेवाईकांना पटली असल्याचे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी सांगितले.
खाडीत बुडालेल्या वडिलांचा ४८ तासांनंतर मृतदेह सापडला

डोंबिवली : शनिवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथील खाडीत पाच वर्षांची मुलगी आणि तिचे वडील बुडाले. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध सुरू केले. ४८ तासांच्या अथक प्रयत्नाने जवानांना खाडीत दूरवर वडिलांचा मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटली असल्याची माहिती विष्णुनगर पोलिसांनी दिली.

अनिल सुरवाडे असे या इसमाचे नाव असून, त्याच्या मुलीचे नाव हिरा आहे. ते याच परिसरात राहणारे होते. डोबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी अनिल सुरवाडे व त्यांची पाच वर्षाची मुलगी हिरा सुरवाडे आले होते. मुलगी खेळत असताना ती खाडी किनारी गेली. ती पाण्यात पडली. तिला पाहून बसलेले तिचे वडील अनिल तिला वाचविण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी मारली. चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचविण्यासाठी धावला; मात्र तोपर्यंत ते दोघेही बुडाले होते. त्याने याबाबत माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत याची माहिती विष्णूनगर पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलिस पथकासोबत खाडी किनारी पोहचले. शुक्रवारी खाडीत शोध कार्य सुरू असताना अग्निशामक दलाच्या जवानांन एक मृतदेह सापडला होता; मात्र हा अनिल सुरवाडे यांचा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध सुरू ठेवला  असताना ४८ तासांच्या अथक प्रयत्नाने खाडीत आणखी एक मृतदेह सापडला. जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने मृतदेह खाडीबाहेर आणला. या मृतदेहाची ओळख नातेवाईकांना पटली असल्याचे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी सांगितले. त्या मुलीचा शोध सुरू असल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in