मुरबाडमध्ये प्लास्टिक बंदीचा बोजवारा

या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासोबतच त्यांचा कचरा देखील उघड्या रस्त्यावर पडल्याचे आढळून आले आहे.
मुरबाडमध्ये प्लास्टिक बंदीचा बोजवारा

मुरबाड : नावलौकिक म्हसा यात्रेत लाखो भाविकांनी भेट दिली. मात्र या यात्रे दरम्यान म्हसा गावात प्लास्टिक पिशव्यांचा खच पडल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासनाने प्लास्टिक बंदीबाबत कठोर नियर्णय केले असून त्याचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसला. अनेकांवर प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी हजार रुपयाचा दंड भरण्याची वेळ आली. मात्र या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासोबतच त्यांचा कचरा देखील उघड्या रस्त्यावर पडल्याचे आढळून आले आहे. म्हसा यात्रेच्या संपूर्ण रस्त्यावर प्लास्टिक पिशव्यांचा खच पडल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाले. म्हसा देवस्थान ट्रस्ट धर्मदाय आयुक्तांच्या अंतर्गत येत असल्याने तालुका जिल्हा प्रशासन शासन निधी उपलब्ध करून देतात. सोयीसुविधा ग्रामपंचायत उपलब्ध करून देतात. कोटी रुपये दान / खर्च करूनही यात्रेतील घाणीचे साम्राज्य दूर अद्याप झालेले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in