व्यावसायिकाने केली पत्नी, मुलाची हत्या स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न

व्यावसायिकाने आपल्या पत्नीची व मुलाची हत्या का केली, याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
व्यावसायिकाने केली पत्नी, मुलाची हत्या स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न

डोंबिवली : एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षीय मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना शुक्रवारी कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीन येथील ओम दीपावली इमारतीत घटना घडली. व्यावसायिकाने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाने आपल्या पत्नीची व मुलाची हत्या का केली, याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गायकवाड असे व्यावसायिकाचे नाव आहे. त्याचे कल्याण शहरात नानूज वर्ल्ड नावाने खेळण्याचे दुकान आहे. दीपक गायकवाड हा त्याची पत्नी अश्विनी आणि सात वर्षांचा मुलगा आदिराज यांच्यासोबत राहतो. शुक्रवारी दुपारी त्याने आपल्या भावाला फोन करून

पत्नी आणि मुलाची हत्या केली असल्याचे सांगत स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. जमिनीवर अश्विनी व सात वर्षांचा मुलगा आदिराजचा मृतदेह पाहून दीपकच्या भावाला धक्काच बसला.

पत्नीची अणि मुलाची हत्या करून दीपक पसार झाला होता. नातेवाईकांनी या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. हत्या करणाऱ्या दीपकचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in