कळवा खाडीचे पात्र या कारणामुळे झाले निमुळते

कळवा परिसरतील झोपड्यांमधे मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक रहातात आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा राबता वाढत चालला आहे
कळवा खाडीचे पात्र या कारणामुळे झाले निमुळते
Published on

कळवा परिसरतील झोपड्यांमधे मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक रहातात आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा राबता वाढत चालला आहे.

कळवा, विटावा, खारेगाव आणि पारसिकनगर या पश्चिमेकडील भाग काहीसा शांत असला तरी कळवा पूर्वेला न्यू.शिवाजी नगर, आनंद नगर, गणपत पाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोणेश्वर नगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबा नगर हा सर्वच परिसर बेकायदा झोपडपट्‌ट्यांनी व्यापलेला आहे. महत्वाचे म्हणजे वन विभागाच्या ताब्यात असलेला पारसिक डोंगर अशा बेकायदा झोपड्यांनी पूर्णपणे वेढला असून या परिसरात बळजबरीने जागा बळकावून झोपड्या बांधणे आणि त्या विकणे या कामात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी दादा आणि गुंड टोळ्या सक्रिय आहेत.

याच प्रमाणे खाडीकिनारी तिवरांची कत्तल करून झोपड्यांचे जाळे खुले आम उभारले जात आहे. हा सर्व प्रकार शासकीय आणि पालिकेच्या यंत्रणा यांच्यात साटेलोटे असल्यानेच उघडपणे सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

खाडीकिनारी भरणी करून झोपड्या मोठ्या प्रमाणात बांधण्यात आल्या आहेत त्यामुळे खाडीचे आधीचे जे महाकाय पात्र होते ते निमुळते झाले असून अशावेळी पाऊस वाढला आणि त्याचवेळी भरती आली तर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या पावसात परिस्थिती अत्यंत भयावह झाली होती आणि राबोडी परिसरात पाणी भरले होते.

logo
marathi.freepressjournal.in