पालिकेच्या पाणीपट्टीची वसुली सुधारली

अवघ्या काही वर्षांपूर्वी जकात सुरू असताना ठाणे पालिकेला हक्काचे उत्पन्न मिळत होते.
पालिकेच्या पाणीपट्टीची वसुली सुधारली

ठाणे पालिका परिसरात तब्बल २१ वर्षानंतर पाण्याचे मीटर बसविण्याचा निर्णय झाला. दोन वर्षांपासून मीटर बसवण्याचे काम सुरु आहे; मात्र पहिल्याच वर्षी या मीटरच्या माध्यमातून जी बिले काढण्यात आली ती सदोष असल्याचे उघड झाले. याचा परिणाम पाणीपट्टी वसुलीवर झाला झाला होता. गेल्या आर्थिक वर्षात ठाणे महापालिकेच्या पाणी बिलाचे २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना केवळ १०५ कोटी ७७ लाख रुपयांची वसुली झाली होती. यंदा नव्याने जी बिले काढण्यात आली आहेत. तीही सदोष असल्याचे उघड झालेले असताना पाणीपट्टीच्या वसुलीत काहीशी वाढ झाली असल्याचे दिसत असून पहिल्या सहा महिन्यांत गेल्या वर्षी २५ कोटी ५५ लाखांची वसुली झाली होती. त्यात यंदा १० कोटींहून अधिक वाढ झाली आहे.

अवघ्या काही वर्षांपूर्वी जकात सुरू असताना ठाणे पालिकेला हक्काचे उत्पन्न मिळत होते. सुरूवातीला जकात बंद करून एलबीटी सुरू करण्यात आली तेव्हा पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घसरले. त्यातच सामान्य टॅक्स, पाणीपट्टी, शहर विकास विभागाचे उत्पन्नही कमी झाले, त्यानंतर एलबीटीही बंद झाली आणि पालिकेच्या उत्पनाला पुन्हा घरघर लागली. तेव्हापासून उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधण्यास सुरवात झाली. तसेच मालमत्ताकर आणि पाणीपट्टीच्या वसुलीकडे जास्त लक्ष द्यायला सुरूवात झाली.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे मार्च २०२०च्या शेवटच्या आठवड्यात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून बहुतांशी आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले दोन महिन्यानंतर जूनपासून पालिकेच्या मालमत्ता कराची वसुली सुरू झाली, तर जुलैअखेरपासून पाणीबिलाची वसुली सुरू असून २०१९-२० यावर्षी १ एप्रिल ते ५ नोव्हेंबर दरम्यान, ३९ कोटी ६९ लाख वसूल झाले होते. २०२१-२२यावर्षी याच दरम्यान सुमारे ६० कोटींची वसुली झाली, तर गेल्या १ एप्रिल २०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ९७ कोटी ८० लाख रुपयांची वसुली झाली होती, तर चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यात ३५ कोटी ९४ लाख रुपयांची वसुली झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in