कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती फलाटवरुन बघता येणार

३१ जुलै पर्यंत ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांना कळवले आहे.
कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती फलाटवरुन बघता येणार

कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यात यावेत यासाठी रेल्वे प्रशासनाशी गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले आहे. कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक वर डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यात आले होते. परंतु इतर फलाट दोन व तीन वर १५ जून ऐवजी आता ३१ जुलै पर्यंत ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांना कळवले आहे.

कर्जत स्थानकात आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. कधी आपला आरक्षित डबा शोधण्याच्या नादात गाडी चुकायची तर कधी सामान फलाटवरच रहायचे तर काही वेळा डबा पकडण्याच्या नादात अपघातही झाले आहेत. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्यांच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्यात यावेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल गेल्या दोन वर्षा पासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते.

त्यानुसार कर्जत रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक एक वर डिजिटल कोच दर्शविणारे इंडिकेटर्स बसविले आहेत.

फलाट दोन व तीन वर इंडिकेटर्स बसविण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक दोन व तीन १५ जुन २०२२ पर्यंत इंडिकेटर्स बसविण्यात येईल असे लेखी कळविले होते, मात्र जून महिना संपत आला तरी डब्यांची स्थिती दर्शवणारे इंडिकेटर्स बसविण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in