पोलिसांच्या व्हॅनमध्येच गुन्हेगाराचा वाढदिवस केला साजरा

पोलिसांच्या व्हॅनमध्ये असतांना देखील हा गुंड केक कापत होता, मात्र त्याला पोलिसांनी मज्जाव का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे
पोलिसांच्या व्हॅनमध्येच गुन्हेगाराचा वाढदिवस केला साजरा

एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात असलेल्या रोशन झा या उल्हासनगरमधील गुंडाचा पोलिसांच्या व्हॅनमध्ये चक्क केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान हा व्हिडिओ त्याच्या समर्थकांनी आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेटसवर ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या व्हॅनमध्ये असतांना देखील हा गुंड केक कापत होता, मात्र त्याला पोलिसांनी मज्जाव का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रोशन झा हा उल्हासनगरमधील गुंड आहे. त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकवणे आणि इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुंडाला कारागृहातून कल्याणच्या न्यायालयात आणण्यात आले होते, यावेळी पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेल्या गुंड रोशन झा यांने खिडकीमधून समर्थकांनी आणलेला केक कापला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. दरम्यान पोलिसांच्या व्हॅनमध्ये हा गुंड त्याचा वाढदिवस कसा काय साजरा करू शकतो असा सवाल उपस्थित झाला आहे. आता या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in