जिल्हा सत्र न्यायालयाने किशोर जगतापचा अटकपूर्व जामीन फेटाळला

त्या संदर्भात त्याने जिल्हा सत्र न्यायालय भिवंडी या ठिकाणी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता.
जिल्हा सत्र न्यायालयाने किशोर जगतापचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Published on

भिवंडी : मैत्रकुलच्या किशोर जगताप याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडला त्यावेळी तरुणी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत कलम दाखल करण्यात आले होते. त्या संदर्भात त्याने जिल्हा सत्र न्यायालय भिवंडी या ठिकाणी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. किशोर जगताप याच्यावर त्यानेच स्थापन केलेल्या मैत्रकुल या निवासी अभ्यास केंद्रातील मुलींचा लैंगिक छळ केल्याची तक्रार तेथील एका विद्यार्थिनीने दाखल केली होती. ६ फेब्रुवारीला जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. परंतु ती सुनावणी १७ फेब्रुवारी २०२४ रोजी झाली. भिवंडीतील आरोपी किशोर जगताप हा दिव्यांग असून, त्याने अतिरिक्त सत्र न्यायालय, भिवंडी येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याबाबतीत न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत जिल्हा सत्र न्यायालय भिवंडी यांनी किशोर जगताप याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

logo
marathi.freepressjournal.in