चिखलोली येथील डम्पिंग प्रकल्पाला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध

डम्पिंगमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या शिवाय शेती देखील बंद झाली आहे.
चिखलोली येथील डम्पिंग प्रकल्पाला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध

अंबरनाथ नगरपालिकेने चिखलोली येथे सुरू केलेल्या डम्पिंग प्रकल्पाला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणा विरोध आहे. नागरिकांचा विरोध न जुमानता सुरू असलेल्या डम्पिंग प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या लवादाच्या समितीला येथील गावकऱ्यांनी घेराव करून संताप व्यक्त केला आहे.

डम्पिंगमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या शिवाय शेती देखील बंद झाली आहे. डम्पिंग भूखंड तात्काळ बंद न केल्यास डम्पिंगचा मार्ग बंद करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अंबरनाथ नगरपालिकेसाठी डम्पिंगची समस्या गेली अनेक वर्षांपासून कळीचा मुद्दा ठरत आहे. पालिकेने आठ महिन्यांपूर्वी चिखलोली येथे सर्व्हे क्रमांक १३२या भुखंडावर कचरा प्रक्रियासाठीं नवीन डम्पिंग ग्राऊंड सुरू केले आहे. परंतु पावसाळ्यात डम्पिंगमधून निघणाऱ्या दुषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत हरित लवादाचा दरवाजा ठोठावला.

लवादात पार पडलेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी, एमपीसीबी, सीबीसीबी यांच्या संयुक्त पथकाला डम्पिंगची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रांत अधिकारी, जयराज कारभारी, एमबीसीबी आणि सीबीसीबीचे अधिकारी तसेच मुख्याधिकारी, डॉ. प्रशांत रसाळ यांनी डम्पिंग ग्राउंडला भेट दिली असता डम्पिंगपरिसरातील चिखलोली आणि जांभुळ गावातील ग्रामस्थांनी प्रशासन अधिकारी यांना घेराव घालत डम्पिंगचे काम तात्काळ बंद करा अशी मागणी केले. डम्पिंगमुळे शेतीचे पिक घेणे बंद झाले असून, कुटूंबाचे आरोग्य बिघडले आहे, घरात दिवस रात्र डास, दुर्गंधी, माशा, दुर्गंधीमुळे घरांची खिडक्यादारे उघडता येत नाही. पालिकेच्या या डम्पिंगमुळे घरात राहणे अवघड झाल्याच्या संतप्त भावना रहिवाशांनी अधिकांर्यामोर व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in