सॅटीस वाहतूक प्रकल्पातील पहिला लोखंडी गर्डर बसवला

ठाणे महापालिकेचे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू आहे
सॅटीस वाहतूक प्रकल्पातील पहिला लोखंडी गर्डर बसवला

ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या ठाणे पूर्व येथील सॅटीस वाहतूक प्रकल्पातील ठाणे स्टेशन पूर्व समोरील पहिला लोखंडी गर्डर सोमवारी पहाटे बसवण्यात आला. २४ मीटर लांबीचा आणि ५२ मेट्रिक टन वजनाचा हा लोखंडी गर्डर आहे. ठाणे पश्चिमप्रमाणेच ठाणे पूर्व येथील स्टेशन परिसरातील वाहतुकीची सुसूत्रता करण्याचे काम ठाणे महापालिकेचे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू आहे. ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हे काम मार्च २०१९ मध्ये सुरू करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे ५५टक्के काम पूर्ण झाले आहे. आजचा लोखंडी गर्डर बसविणे हा या कामातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. लोखंडी गर्डर पहाटे बसविण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in