गडकरी रंगायतन नाट्यगृहाची ऐतिहासिक वास्तू धोकादायक

काही वर्षात छत कोसळण्याच्या तसेच वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत
गडकरी रंगायतन नाट्यगृहाची ऐतिहासिक वास्तू धोकादायक

सांस्कृतिक उपराजधानी समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरात महापालिकेचे भूषण असलेले गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. जवळपास ४० वर्षे जुनी असलेली ऐतिहासिक वास्तू धोकादायक होऊ लागली आहे.

गेल्या काही वर्षात छत कोसळण्याच्या तसेच वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत. त्यामुळे ही धोकादायक होऊ लागलेली वास्तु वारंवार दुरुस्त करण्यापेक्षा पर्याय म्हणून नविन नाट्यगृहाची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी पाच वर्षांपूर्वीच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने केली होती. मात्र या मागणीकडे डोळेझाक करून गडकरी रंगायतनच्या दुरूस्तीवर करोडोची उधळण सुरु आहे. विशेष म्हणजे यंदाही बजेटमध्ये गडकरींच्या दुरूस्तीसाठी नव्याने ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीकरिता मागील काही वर्षांपासून ठामपाने कोट्यवधींचा खर्च केला आहे. तीन वर्षांपूर्वी नाट्यगृहाच्या छताचे प्लॅस्टर कोसळले होते. ठामपाने छत दुरुस्त केले आणि सदर वास्तूचा परिक्षण अहवाल मागवला. त्यानंतर वास्तू दुरुस्त

करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र वारंवार होणार्‍या दुरुस्तीच्या खर्चावर पर्याय म्हणून नाट्यगृहाची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या

विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने गडकरी रंगायतनच्या छतावर शेड टाकण्याचा निणर्य घेण्यात आला. विशेष म्हणजे करोडो रुपये खर्च करून जे शेड बांधण्यात आले आहे तेही चुकीच्या पद्धतीने बांधले असल्याचे उघड झाले होते. गेल्या सहा वर्षात गडकरी रंगायतच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. स्थापत्य कामांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी २९ लाख ३८ हजार, विद्युत कामांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी १७ लाख ८२ हजार तर अग्निशमन यंत्रणा दुरुस्तीसाठी ९६ लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आलेले असताना यंदाही बजेटमध्ये नव्याने ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in