चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले ; ६ तासांत रिक्षाचालकाला अटक

डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सहा तासांच्या आत चोरट्याला रामनगर पोलिसांनी अटक केली.
चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले ; ६ तासांत रिक्षाचालकाला अटक

डोंबिवली : महिलेच्या गळ्याला चाकू लावून रिक्षाचालकाने लुटल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या रिक्षाचालकाला सहा तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आजदे गावातून कल्याणमधील ए.पी.एम.सी. मार्केटला जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, पर्स असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून पळ काढला. ही घटना २२ तारखेला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सहा तासांच्या आत चोरट्याला रामनगर पोलिसांनी अटक केली. चोरी करताना तरुणाबरोबर आणखी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अनिल अशोक खिल्लारे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल हा रिक्षाचालक असून, त्याच्याबरोबर चोरीच्या गुन्ह्यातील दोघे अल्पवयीन मुलांवर चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी असे एकूण चार गुन्हे डोंबिवली व वाशिंद पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा आणि चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in