धुक्यामुळे माळशेज घाटाची वाट झाली बिकट

एकीकडे धुक्यामुळे अंधार आणि दुसरीकडे खड्डे यामुळे वाहनचालक अडचणीत सापडला आहे
धुक्यामुळे माळशेज घाटाची वाट झाली बिकट

गेले तीन दिवस पावसाने मुरबाड तालुक्यासह माळशेज घाटात थैमान घातला असुन माळशेज घाट दाट धुक्यांनी संपुर्ण: झाकला गेल्यामुळे रस्त्यावरील वाहनांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर घाटातील रोडवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालक आपला जीव मुठीत घरून प्रवास करत आहे. एकीकडे धुक्यामुळे अंधार आणि दुसरीकडे खड्डे यामुळे वाहनचालक अडचणीत सापडला आहे.

माळशेज घाटाचा रस्ता वैशाखरे पासुनच सुरू होतो, परंतु घाटातील घनदाट झाडी, निसर्गरम्य डोंगरावरील दाट धुके, जागोजागी असणारे धबधबे, रस्त्यावर खड्ड्यातून झोके देणारी वाहने ही सगळी परिस्थीती ओके असल्याचे दाखवत एसटीचालक, खाजगी वाहने, मालवाहतुक ये-जा करत आहेत. सतत पावसाचा मारा सुरू असल्यामुळे माळशेज घाटावर पर्यटकांना बंदी घालण्यात आल्यामुळे धबधबे ओस पडले आहेत. खड्डेमय रस्ते, कोसळणाऱ्या दरडी, थंडमय वातावरणात पर्यटकांनी भितीपोटी पाठ फिरवली असल्याचे पर्यटक तसेच स्थानिक छोटे व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

संध्याकाळी सहा वाजल्यानंतर माळशेजघाटात समोरची वाहने दिसत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. माळशेज घाटातील संरक्षण भिंती खचलेल्या आहेत. तसेच रस्त्यावर मध्यभागी पडत असलेला धबधबा वाहनांना जाग्यावरच थांबवतो. मुरबाडवरून नगर आळेफाटाकडे जाणारी वाहने रात्रीच्या वेळी कमी जातात. आळेफाटा नगरवरून कल्याणकडे जाणारी भाजीपाला, फुले अन्य वस्तू घेवून जाणारी वाहने तसेच प्रवाशांची वाहने रात्रीच्या वेळी घनदाट धुक्यातून मुरबाड मोरोशी येईपर्यंत सुटकेचा श्‍वास टाकतात. मुरबाड - कल्याण पर्यंतच्या रस्त्यालगत घनदाट गवत उभा राहिला आहे. माळशेज घाटापासून मुरबाड -कल्याणपर्यंत दोन्ही बाजुला रस्त्याची संरक्षण कथडे नाही, रस्त्यावर पिवळे-सफेद पट्टे नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपघात होतात.

नॅशनल हायवेचे अधिकारी शासनानी तयार केलेली आपत्कालीन यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे. रात्रीच्या वेळी माळशेज घाटात पोलीस यंत्रणा, हायवेची रुग्णवािहका नसल्याने घनदाट धुक्यात झालेल्या आपघात ग्रस्तांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा मिळत नाही. आळेफाटा नगर, शिर्डी, पुणे, औतुर, जुन्नरकडे माळशेज मार्गी कमी वेळात जाता येते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in