मृत्यूपश्चातही प्रेताच्या नशिबी मरणयातना: स्मशानभूमीचा प्रवास खडतर; नाशेरा ग्रामस्थांची शोकांतिका

मृत्यू पश्चातही प्रेताच्या नशीबी हेळसांड येत असल्याने नाशेरा ग्रामस्थांमधून संतापाचे वातावरण आहे.
मृत्यूपश्चातही प्रेताच्या नशिबी मरणयातना: स्मशानभूमीचा प्रवास खडतर; नाशेरा ग्रामस्थांची शोकांतिका

दीपक गायकवाड/ मोखाडा : मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम नाशेरा गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अक्षरशः दगड धोंड्यातून, खाचखळग्यातून वाट काढीत तब्बल अर्धा किलोमीटर प्रेताला घेऊन नदी काठावरील स्मशानभूमीकडे जावे लागते आहे. मृत्यू पश्चातही प्रेताच्या नशीबी हेळसांड येत असल्याने नाशेरा ग्रामस्थांमधून संतापाचे वातावरण आहे.

नाशेरा गाव हे नदीच्या काठावर अक्षरशः बेटावर वसलेले आहे. रोजच्या दिनचर्येचा प्रवासही खडतर असून, त्यातही भौतिक साधन सुचितेचाही अभाव असल्याने येथील ग्रामस्थांचा एकूणच प्रशासकीय व्यवस्थेबाबत नाराजीचा सुरू आहे. त्यातही मागील अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सोईचा रस्ताच नसल्याने आणि वारंवार मागणी करूनही जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याकडे सोईस्करपणे कानाडोळा करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र भावना आहे.

एकीकडे विकास कामांवर वारेमाप खर्च करणारे जिल्हा परिषदेचे बांधकाम प्रशासन दुसरीकडे मात्र आदिवासी जनजीवनाशी निगडित असलेल्या सोईसुविधांच्या निर्मितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने तालुक्यातून आश्चर्य व्यक्त केले जात असून, बांधकाम प्रशासन आणि पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उभे केले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in